अकोला येथे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय न्यासाच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा अभिनव उपक्रम !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय न्यासाच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा अभिनव उपक्रम मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात घेण्यात आला. यात ६०० विद्यार्थिनी आणि शिक्षक या वेळी उपस्थित होते .

महाराष्‍ट्राचे वर्ष २०२४-२५ पर्यंत २ सहस्र ७९५ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्‍ट !

राज्‍यात ५ प्रकल्‍पांची कामे वेगाने चालू आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक प्रकल्‍पाची वीजनिर्मितीची क्षमता निश्‍चित करण्‍यात आली असून वर्ष २०२४-२५ पर्यंत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हे उद्दिष्‍ट पूर्ण करण्‍यात येणार आहे.

छत्रपती शिवरायांचा पराक्रम ऐकून होणार मंत्रालयाच्या नियमित कामकाजाचा प्रारंभ !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! राज्यातील शाळांमध्येही अशा स्वरूपाचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास रुजवायला हवा !

कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामांचा आज प्रारंभ होणार

यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम : सुराज्य अभियान !

आम्ही राबवत असलेल्या किंवा आपल्याला लक्षात आलेल्या काही नवीन मोहिमा आपण निश्चितपणे राबवू शकता. याविषयी कुणाला काही शंका किंवा कशा प्रकारे उपक्रम राबवायला हवेत ? याविषयी माहितीसाठी आम्हाला अवश्य संपर्क करा.

विदेशी शक्‍तींनी कुकी समाजाला फूस लावून त्‍यांच्‍याकडून दंगली घडवून आणल्‍या ! – जोजो नाक्रो नागा, पत्रकार, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

मणीपूरच्‍या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.

सिंधुदुर्ग : ‘ऑनलाईन’ अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ! 

शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.

‘आय.आय.टी.’साठी लवकरच कायमस्वरूपी भूमी उपलब्ध करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारला ‘आय.आय.टी.’साठी भूमी उपलब्ध करण्यास अपयश आल्याचे सांगितले. त्यावर असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शिक्षणासंबंधी अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना दिले.

पणजी ‘स्मार्ट सिटी’ची आतापर्यंत ३३ टक्के कामेच पूर्ण ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विरोधक सातत्याने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावरून पणजी शहराला नावे ठेवत असल्याने त्रस्त झालेले मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची १०० टक्के कामे पूर्ण झाल्यावर पणजी शहर ‘स्मार्ट’ दिसेल. चालू वर्षअखेरपर्यंत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

गोव्यात कह्यात घेतलेले २५ किलो अमली पदार्थ आज नष्ट केले जाणार

संपूर्ण देशभरात आज नष्ट करण्यात येणार्‍या अमली पदार्थांची संख्या पकडल्यास १ जून २०२२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ नष्ट केल्याची संख्या १० लाख किलोवर (किंमत सुमारे १२ सहस्र कोटी रुपये) पोचणार आहे !