रत्नागिरी : ‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

खडपाबांध, फोंडा येथे मूर्तीशाळा आणि शेतकरी बाजार यांचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते उद्घाटन

‘आविष्कार कला केंद्र’ आणि ‘शेतकरी बाजार कृषी सेवा केंद्र’ यांच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील रविनगरजवळील धायमोडकर सदन येथे श्री गणेशमूर्ती शाळा अन् शेतकरी बाजार हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे.

रत्नागिरी येथील कु. मृण्मयी महेश कात्रे यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतांना आलेल्या अनुभूती

भगवंताच्या कृपेने ‘ऑनलाईन’ स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होणे

‘विक्रम’ लँडरमधून बाहेर आले ‘प्रज्ञान’ रोव्हर !

पुढील १४ दिवस ‘विक्रम’ आणि प्रज्ञान’ चंद्राचा अभ्यास करणार आहेत. चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे यापूर्वी इस्रोच्या संशोधनातून समोर आले होते. आता त्याचा अधिक सखोल अभ्यास या दोघांच्या माध्यमांतून केला जाणार आहे.

गोव्यात शिवछत्रपती यांच्या पुतळ्यावर ११ ठिकाणी सामूहिक दुग्ध-जलाभिषेक !

पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.

भारताची चंद्रझेप यशस्वी !

भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ची महत्त्वपूर्ण योजना असणार्‍या ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वीपणे उतरले. यामुळे केवळ भारताच नव्हे, तर जगभरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला !

शिवप्रेमींच्या वतीने गोवा राज्यभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ !

म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेनंतर शिवप्रेमींनी गोवाभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाची सांगता फर्मागुडी, फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महादुग्ध-जलाभिषेक करून होणार आहे.

आय.व्ही.एफ्. उपचारपद्धत विनाशुल्क देणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

प्रत्येक आय.व्ही.एफ्. उपचारपद्धतीसाठी सरकार सरासरी ५ ते ७ लाख रुपये खर्च करणार ! उपकरणांसाठी सरकार खासगी आस्थापनांकडून सी.एस्.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून साहाय्य घेणार आहे.

‘सुराज्य अभियान’

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या उपक्रमाला नाशिक येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

या निवेदनाद्वारे शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी, जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन आणि विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी, आशा मागण्या करण्यात आल्या.