महिला आणि बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांवर कार्यवाही करा ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा

महिला आणि बालक यांच्याविषयी असणार्‍या संरक्षण तसेच प्रतिबंधात्मक कायद्यांवर प्रभावी कार्यवाही करा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण होणे आवश्यक आहे.

पुणे येथे अधिक लाभाचे आमीष दाखवून दीड कोटी रुपयांची फसवणूक !

अधिक लाभाच्या मागे लागल्यास काय होते हे दर्शवणारा प्रसंग !

बांधकाम अनुमतीसाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना तिघांना रंगेहात पकडले !

तक्रारदार यांच्याकडे बांधकामास अनुमती देण्यासाठी १० लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. यापैकी ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना कराड नगरपालिकेचे साहाय्यक नगररचनाकार यांच्यासह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

वर्ष १९९२ पासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूर येथील मंडळ !

५ जानेवारी १९९२ या दिवशी स्थापन झालेले आणि गेली ३३ वर्षे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जपत कार्यरत असलेले एक रिक्शा मंडळ आहे ते म्हणजे ‘श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक रिक्शा मित्रमंडळ’ होय !

संशयास्पदरित्या आढळणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कारवाई होणार !

महाविद्यालयीन युवक-युवती कराड परिसरातील सुर्ली घाट, डिचोली डोंगर, टेंभू कॅनॉल, आगाशिव डोंगर, वाखाण रस्ता यांसह अनेक निर्जनस्थळी फिरत असतात.

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी २९ मार्चला काढण्यात येणार्‍या मूकपदयात्रेत सहभागी व्हा !

छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या अतुलनीय शौर्याचे, त्यागाचे, बलीदानाचे प्रतीक म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना’च्या वतीने गेली ३ वर्षे मूकपदयात्रा काढण्यात येत आहे.

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने नदीकाठचा कचरा आणि नदीतील शेवाळे काढण्याचे काम चालू !

पंढरपूर – पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठाचा कचरा आणि नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे. पाणी वहाते नसल्याने शेवाळ्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पाण्याची पातळी न्यून झाल्याने नदीपात्रात भाविकांना स्नान करतांना अडचणी निर्माण होत आहेत. याची नोंद घेत प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन … Read more

अवैध हुक्का पार्लर चालवणार्‍या उपाहारगृहाचा परवाना कायमचा रहित करणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

अशी माहिती गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य सुनील कांबळे यांनी पुणे येथील अवैध हुक्का पार्लरविषयी हा तारांकित प्रश्न विचारला होता.

पूर्वी कुटुंबासारखा एकजूट असलेला समाज, आणि आज तुकडे तुकडे झालेला समाज !

‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’