
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) – छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या अतुलनीय शौर्याचे, त्यागाचे, बलीदानाचे प्रतीक म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना’च्या वतीने गेली ३ वर्षे मूकपदयात्रा काढण्यात येत आहे. यंदा ही पदयात्रा २९ मार्चला दुपारी ४ वाजता सिल्लोड येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक येथून प्रारंभ होऊन तलाठी भवन जवळ समारोप होईल. यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण आणि पुढील वर्षासाठी महासंकल्प घेण्यात येणार आहे. तरी या उपक्रमात प्रत्येक हिंदु बांधवाने सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना’च्या वतीने श्री. कमलेश कटारिया यांनी केले आहे.