उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर या दिवशी महाराष्‍ट्रात येणार !

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड

मुंबई – उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर या दिवशी महाराष्‍ट्रात येणार आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेल्‍या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेच्‍या शतकपूर्ती स्‍थापना दिन सोहळ्‍यास प्रमुख पाहुणे म्‍हणून उपराष्‍ट्रपती मुंबईमध्‍ये येणार आहेत. या वेळी उपराष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या शताब्‍दी स्‍तंभाचे उद़्‍घाटनही होणार आहे.