कोल्हापूर, २ डिसेंबर (वार्ता.) : राजारामपुरी येथील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे १ डिसेंबर या दिवशी पार पडलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यासाठी ६०० हून अधिक वाचक, जिज्ञासू उपस्थित होते. या सोहळ्यात वाचकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ने त्यांच्या जीवनात कसा पालट घडवला ? याविषयी त्यांचे अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. जिज्ञासू आणि वाचक सोहळा संपेपर्यंत थांबले होते.
विशेष
रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे यांनी ७ जणांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वर्गणीदार केले.
उपस्थित मान्यवर
पू. ह.भ.प. धोंडिराज रक्ताडे महाराज, ह.भ.प. महादेव यादव महाराज, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु महासभेच्या शीलाताई माने, भाजप युवामोर्चाचे श्री. युवराज शिंदे, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. महेश चौगुले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, ‘श्री’ संप्रदायाचे श्री. कृष्णात माळी, वैद्या अश्विनी माळकर कृतीस प्रवृत्त करणार्या ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांना नितांत आदर !
हे ही वाचा → कोल्हापूर येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्यमहोत्सवी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
झोपी गेलेल्या हिंदूंमधील धर्माभिमान जागवण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – रवींद्र ओबेरॉय, ‘जाययंटस् चॅरिटेबल ट्रस्ट’चे विश्वस्त आणि ‘युथ होस्टेल असोसिएशन’चे संस्थापक-अध्यक्ष
आज बहुतांश हिंदूंना देश आणि धर्म यांविषयी अभिमान नाही. त्यामुळे ‘एकेकाळी संपूर्ण जगावर राज्य करणार्या भारताचे तीन तुकडे होतात कि काय ?’ अशी स्थिती आहे. यासाठी आपण जागृत राहिलो नाही, तर अतिशय कठीण परिस्थिती निर्माण होईल. झोपी गेलेल्या हिंदूंसह त्यांच्यातील धर्माभिमान जागृत करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत काही प्रमाणात हिंदू जागृत झालेले दिसले. यापुढील काळात आपल्या वैभवशाली इतिहासाला झळाळी येण्यासाठी हिंदूंनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.
दैनिक सनातन प्रभात हे वैचारिक आणि आध्यात्मिक पत्र ! – सचिन कुलकर्णी, उद्योजक
दैनिक सनातन प्रभात हे दैनिक नसून वैचारिक आणि आध्यात्मिक पत्र आहे. सकाळी कोणतेही काम चालू करण्याआधी हे पत्र वाचल्याविना प्रेरणा आणि ऊर्जा मिळत नाही. दैनिकातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार मनाला स्फुरण देतात. यातील संपादकीय लेख संग्रही ठेवण्यासारखे असतात. भारतात आणि भारताबाहेर ज्या काही घटना घडतात, त्या वस्तूनिष्ठ अन् सत्य स्वरूपात वाचायच्या असतील, तर त्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ हाच पर्याय आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या सदरातील सूचना जर आपण अमलात आणल्या, तर आपण आरोग्यसंपन्न होऊ, यात दुमत नाही. देव, देश आणि धर्म यांसाठी निर्भीडपणे विचार मांडणारे हे जगातील एकमेव दैनिक आहे.
‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळेच धर्मनिष्ठा आचरणात आली ! – डॉ. हरिष कुलकर्णी, प्राचार्य, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्र
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी २५ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. देशप्रेम आणि धर्मप्रेम यांमुळेच हे शक्य झाले आहे. ‘सनातन प्रभात’च्या प्रत्येक पृष्ठावर वैशिष्ट्यपूर्ण लिखाण असते. पृष्ठावरील लेख वाचनीय असतात. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार’ मी न चुकता वाचतो. यातून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्याचे विचार मिळतात. प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रासादिक शिकवणीचा उपयोग दैनंदिन जीवनात होतो. सनातन प्रभातमधील अग्रलेखातून सडेतोड विचार वाचायला मिळतात. सनातन प्रभात प्रत्येक विषयाला हात घालते. मध्यंतरी दैनिकातून राज्यातील बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी लिखाण करण्यात आले होते.
स्वभावदोष निर्मूलन कसे करावे ? हे आम्ही विद्यार्थ्यांना दैनिकातील मार्गदर्शनामुळेच सांगू शकतो. मी जर ‘सनातन प्रभात’चा वाचक नसतो, तर धर्मनिष्ठा आमच्या आचरणात आली नसती. त्यामुळे ‘प्रत्येकाने हे दैनिक वाचावे’, असे आवाहन मी करतो.
हिंदूंना मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – रमेश पडवळ, व्यावसायिक, मलकापूर
गेल्या १७ वर्षांपासून मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. मी जे राष्ट्र आणि धर्मजागृतीचे काम करत आहे, त्या मागची प्रेरणा सनातन प्रभात’च आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड (भूमी) जिहाद’, ‘हलाल जिहाद’, यांसह सच्चर आयोगाच्या संदर्भातील वस्तूस्थिती आणि हिंदु धर्मावर होणारा प्रत्येक आघात ‘सनातन प्रभात’मधून मांडला जातो. आपला देश वर्ष १९४७ मध्ये स्वतंत्र झाला; मात्र खर्या अर्थाने हिंदूंना मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्यासाठी एका झाडाच्या पानांवर ‘क्यू आर् कोड’ लावण्यात आला होता. या आगळ्या-वेगळ्या संकल्पनेचा उपयोग करत अनेक जण दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.
क्षणचित्रे
१. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्यासाठी राबवलेल्या या संकल्पनेकडे अनेक जण आकृष्ट होत होते. अनेकांनी या नाविन्यतेचे कौतुकही केले.
२. सभागृहात येतांना नमस्काराच्या मुद्रेतील ‘सनातन प्रभात’मधील ‘समर्थ’ या बोधचित्राचे ‘कटआऊट’ (फलक) लावण्यात आले होते.
३. ‘सनातन प्रभात’विषयीच्या ‘आपण माझ्याविषयी काय सांगाल ?’ या वैशिष्ट्यपूर्ण फलकावर अनेकांनी त्यांचे अभिप्राय लिहिले.