हिंदु जनजागृती समिती, इस्कॉन आणि हिंदुत्वनिष्ठ यांची जळगाव जिल्हाधिकार्यांकडे मागणी !
जळगाव – बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, तेथील हिंदु नेते आणि साधू-संत यांनाही खोट्या आरोपांत अडकवण्याचे रचण्यात आलेले षड्यंत्र यांविरुद्ध बांगलादेशाला खडे बोल ऐकवून तेथील हिंदूंचे रक्षण भारत सरकारने करावे, या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना इस्कॉन, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दिले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
निवेदनातील मागण्या !
१. बांगलादेश सरकारवर दबाव आणून इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलावे आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्यात यावी.
२. बांगलादेशातील हिंदु समाजाच्या धार्मिक स्थळांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेश सरकारला दायित्वाची जाणीव करून द्यावी.
३. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांचे साहाय्य घ्यावे.
४. भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणून अल्पसंख्यांक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करावी.