संपादकीय : पुन्हा एकदा रोखठोक !
आधीच्या सरकारांनी ‘शांतीची कबुतरे’ उडवण्याचेच काम केले. त्याच्या पलीकडे जाऊन ‘राष्ट्रासाठी काही तरी करायला हवे’, ‘अरे’ला ‘कारे’ म्हणायला हवे, हेच मुळात कुणी कार्यवाहीत आणले नाही. त्यामुळे ‘कुणीही यावे आणि भारताला टपली मारून जावे’, अशी गत देशाची झाली होती.