मुंबईकर जागे रहा !
‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल’, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर हिंदूंची मुंबईतील भयावह स्थिती ‘मुंबईकर जागे रहा !’, या लेखमालेच्या माध्यमातून दर्शवत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई अन् सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा, ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूना कलंकित करण्याचे षड्यंत्र, मुंबई सुरक्षित नाही, तसेच एकेकाळची शांत आणि सुंदर मालवणी झाली भकास’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
मुंबईतील वस्त्यांमध्ये विशिष्ट अल्पसंख्यांक समुदायाच्या संख्येत वाढ झाली आहे. यातील बरेचसे रोहिंग्या, बांगलादेशी मुसलमान आणि देशातील विविध भागांतून स्थलांतरित झालेले आहेत. काही ठिकाणांहून हिंदू कुटुंब वस्ती सोडून जात आहेत आणि विशिष्ट अल्पसंख्यांक समुदायाची लाेकसंख्या मात्र वाढत आहे. हे एकूणच मुंबईची लोकसांख्यिकी पालटण्याचा प्रकार आहे. मुंबईच्या मालवणीत जे ‘पॅटर्न’ (विविध पद्धत) राबवले जात आहेत, ते मुंबईच्या इतर भागांतही राबवले जात आहेत. या विकृत तालिबानी मानसिकतेने मुंबईला वेढा घातलेला आहे. हा वेढा जोपर्यंत आपण तोडत नाही, तोपर्यंत मुंबई असुरक्षित रहाणार आहे. काश्मीर हा एक ‘फॉर्म्यु’ला (नियोजनबद्ध नमुना) आहे. तो कुठे कुठे राबवता येऊ शकतो, याचे डावपेच चालू आहेत कि काय ? असा संशय येतो. बंगाल आणि आसाम येथील उदाहरण आपल्या समोर आहे. मुंबईत वर्ष २०१२ मध्ये झालेली आझाद मैदान दंगल ही एक लिटमस चाचणी होती का ? असा संशय येतो.
आता आपण मुंबईतील इतर वस्त्यांमध्ये कशी परिस्थिती आहे, हे जाणून घेणार आहोत, म्हणजे मुंबईत लोकसांख्यिकी झपाट्याने पालटत आहे, हे लक्षात येईल. मी केलेल्या अभ्यासातून जे लक्षात आले, ते तसेच्या तसे मी तुमच्या समोर मांडणार आहे.
भाग ४.
भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/858066.html
मुंबईच्या कोणत्या भागात लोकसांख्यिकी पालट होत आहेत ?
मालवणी, ज्ञानेश्वरनगर वसाहत, इंदिरानगर झोपडपट्टी, शिवनगर, शिवडी क्रॉस रोड, सेनानगर वस्ती, दगडी चाळ, लेबर कॅम्प, डॉकयार्ड रोड; जिजामातानगर, वरळी; प्रेमनगर वस्ती, वरळी ‘सी फेज’, बीडीडी चाळ; शास्त्रीनगर वस्ती, वरळी; आझमी नगर, राठोडी, माहीम कापड बाजार, बेहरामपाडा, भारतनगर वस्ती, दारूखाना, बगीचा वस्ती, गोपीनाथ शिवनेरी को-ऑप. सोसायटी, संगम गल्ली, चिरागनगर, अंबुजवाडी इत्यादी वस्त्या या आज लोकसांख्यिकी पालटाची जिवंत साक्ष देत आहेत. या वस्त्यांमध्ये मुसलमानांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. कुणाचीही आर्थिक मिळकत फार चांगली नसून बर्याच ठिकाणी संवेदनशील आणि त्रासदायक वातावरण आहे. हा एकूणच मुंबईची लोकसांख्यिकी पालटण्याचा प्रकार आहे.
वाढणारी मुसलमान वस्ती, अतीलोकसंख्या, भूमीचा विकास न होणे, भूमाफिया, स्थानिक नेत्यांकडून धमक्या, अमली पदार्थांचा व्यापार अशा कारणांमुळे सहिष्णू हिंदू नागरिक वस्ती सोडून जात आहेत. मांस, मटका, जुगार, भ्रमणभाष संच आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण यांची चोरी, वीज अन् पाण्याची चोरी, वस्तीतील गुंड, ‘बेटिंग’ (पैजा लावणे), पाकीटमारी अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना तिथे सर्रास घडतात. काही ठिकाणी तर तिहेरी तलाक (घटस्फोट); जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०, ३५ अ रहित करणे; नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या नंतर संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते.
१. आग्रीपाडा
नाव जरी आग्रीपाडा असले; पण येथे नावालाही आगरी समाज बघायला मिळणार नाही. हा तोच आग्रीपाडा आहे, जिथे वर्ष १९९३ च्या बाँबस्फोट प्रकरणातील बहुतांश आरोपी वास्तव्यास होते. याच आग्रीपाड्यात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. येथे जलील अन्सारी उर्फ डॉ. बाँब या नावाने ओळखला जाणारा आतंकवादी याच आग्रीपाड्यात रहायला होता.
२. घाटकोपर-चिरागनगर-आझादनगर
या रहिवाशी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक समुदाय रहात आहे आणि त्यांच्या लोकसंख्येचा आलेखही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या भागात रहाणारे अल्पवयीन मुले, तरुण हे अमली पदार्थांच्या व्यसनाकडे वळत आहेत. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणात चरस, गांजा यांच्या विक्रीचा बेकायदेशीर धंदा चालू आहे.
३. बेहरामपाडा, वांद्रे पूर्व
हा तोच बेहरामपाडा आहे जिथे प्रत्येक १-२ वर्षांनी मोठे अग्नीकांड होते. त्यात शेकडो झोपड्या जळून खाक होतात आणि पुन्हा उभ्याही रहातात. या सर्व झोपड्या अनधिकृत आहेत. वांद्रे रेल्वेस्थानकाच्या जवळच या अवैध झोपड्या एकावर एक बांधल्या आहेत. आजपर्यंत एकदाही रेल्वे प्रशासनाने इथे अतिक्रमण करणार्यांवर कारवाई केली ना महानगरपालिकेने ! हे अतिक्रमण करणारे लोक तेच आहेत जे भारतीय राज्यघटनेला जुमानत नाहीत.
४. भारतनगर वस्ती, वांद्रे पूर्व
भारतनगर वस्ती, वांद्रे पूर्व या ठिकाणी पूर्वी वाल्मीकि समाज मोठ्या संख्येने वास्तव्य करत होता; पण स्थानिक धर्मांध गुंडांकडून तिथल्या रहिवाशांना त्रास दिला जातो. अमली पदार्थ, भूमाफिया, धर्मांधता, स्थानिक गुंडांची दहशत अशा समस्या इथे मोठ्या प्रमाणात आहेत. ही वस्ती ‘अतिसंवेदनशील क्षेत्र’ म्हणून ओळखली जाते. यावरून येथील दाहकता लक्षात येते.
५. माहीम कापड बाजार
माहीम कापड बाजार परिसर हा मुसलमानबहुल वस्तीने गजबजलेला आहे. बाहेरून येणारे अनेक अल्पसंख्यांक येथे आश्रय घेतात, असे म्हटले जाते. वर्ष १९९३ च्या दंगलीच्या काळातही इथे तणावपूर्ण वातावरण होते. आताचे उदाहरण द्यायचे म्हटले, तर गेल्या वर्षी अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरासाठी ‘निधी समर्पण अभियाना’त ७ रामभक्तांना माहीम परिसरात जवळपास ६०० कट्टरपंथियांनी घेरले होते. या संदर्भात पोलीस कारवाईची मागणी माहीम पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
६. अंबुजवाडी
अंबुजवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भूमाफियांचा सुळसुळाट झाला आहे. येथे सरकारी जागेवर अतिक्रमण करून अवैध झोपडपट्टी उभारण्यात आलेल्या आहेत. या उभारण्यात आलेल्या झोपड्या रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना विकत असल्याचा प्रकार पहायला मिळतो. वरील सर्व अवैध बांधकाम आणि झोपडपट्टी उभारणीकडे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे, एवढी भूमाफियांची दहशत आहे. या अवैध झोपडपट्टीमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आणि त्यासह अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे तिथला भूमीपुत्र असलेला कोळी समाज हा हद्दपार होत आहे. हे जर असेच चालू राहिले, तर एक दिवस असा येईल की, अंबुजवाडी अवैध धंद्यांसाठी ओळखली जाईल.
७. शिवडी विभाग
शिवडी विभाग, म्हणजे नशेचे माहेरघर झालेला आहे. शिवडी क्रॉस रोड परिसरात गांजा, चरस आणि इतर नशा केला जातो. नॅशनल मार्केट हे आता मुसलमानबहुल क्षेत्र झालेले आहे. इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान सर्रासपणे अवैध पद्धतीने रहात आहेत. इथे गोमांसाचाही व्यापार चालत असल्याचे स्थनिकांकडून कळते. नमाज पढण्यासाठी रस्ता अडवला जातो आणि विनाकारण लोकांना त्रास दिला जातो. सेनानगर परिसरात तर नावाला हिंदु नागरिक शिल्लक राहिलेले आहेत. येथे प्रचंड अवैध झोपड्या आढळतात. शिवडी पूर्वेकडील भागसुद्धा मुसलमानबहुल आहे. या भागात तेलमाफियांचा सुळसुळाट आहे. इतर धर्मियांना दमदाटी करणे, महिलांची छेड काढणे, असे प्रकार इथे घडतात. गेल्या २ दशकांपासून स्थानिक रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये लहान लहान क्षेत्रफळाच्या खोल्या सिद्ध करून स्थानिक प्रशासनाला लाच देऊन वीज मीटर, पाणीपट्टी असे पुरावे सिद्ध केले जातात. पुढे त्यांना ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा’च्या अंतर्गत फुकट घरे मिळतात.
८. दारूखाना, डॉकयार्ड विभाग
दारूखाना, डॉकयार्ड विभागात पूर्वी हिंदु मोठ्या प्रमाणात रहात होते; पण आता मराठी भूमीपुत्र बाहेर फेकले गेले आहेत. इथेही अमली पदार्थांचा व्यापार चालतो. कौला बंदर, अशा वस्त्यांमध्ये अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. देशाच्या नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या सिद्ध करणार्या ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी’च्या कुंपणापर्यंत अतिक्रमण करून झोपड्या बांधायला प्रारंभ झालेला आहे. वाडी बंदर – नवानगर परिसरातही अमली पदार्थांची विक्री होते. येथील मराठी हिंदु लोकसंख्या न्यून झाली असून हा भाग अल्पसंख्यांकबहुल झालेला आहे. प्रशासनाने येथील अनधिकृत झोपड्या पाडल्या, तरी हे लोक पुन्हा पुन्हा झोपड्या उभारतात.
९. धारावी झोपडपट्टी
धारावी ही जगातील ‘सर्वांत मोठी झोपडपट्टी’ म्हणून ओळखली जाते. या विभागात पूर्वी हिंदु प्रामुख्याने तमिळ लोक पुष्कळ होते; पण आता त्यात घट झालेली आहे. बगीचा वस्तीतील हिंदु धर्मीय स्थलांतिरत झाले आहेत. तिथे केवळ ५ टक्के हिंदू शेष राहिले आहेत. सामाजिक अस्थिरता निर्माण करणे, अमली पदार्थांचा व्यापार इत्यादी गुन्हे सर्रास घडतात. गोपीनाथ कॉलनी, शिवनेरी विभागातील हिंदूंना पुष्कळ त्रास देण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. म्हणून अनेक मध्यमवर्गीय हिंदूंनी येथून पलायन केले आहे. संगम गल्लीमध्ये तर हिंदू नावालाही उरलेले नाहीत. तिथे अमली पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. इथे महिलाही सुरक्षित नाहीत. सरकारी भूमीवर अवैधरित्या कब्जा मिळवला जातो, तसेच बेकायदेशीर प्रार्थनास्थळे उभारली जातात.
सर्व वस्त्यांचे वास्तव वाचल्यावर मुंबईचे भेदक वास्तव लक्षात येते. या सर्वांची दाहकता सर्वसामान्य मुंबईकरांना लक्षात यावी म्हणून हा लेख प्रपंच !
(क्रमशः)
– मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम.
भाग ५. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/859484.html
संपादकीय भूमिकामुंबईसह देशभरात होत असलेले लोकसांख्यिकीय पालट रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ हुसकावून लावायला हवे ! |