थोडक्यात महत्त्वाचे

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत आहे. त्यामुळे संवेदनशील एकांतात असलेले शेतशिवार आणि माळरान येथील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने सिद्ध केला आहे.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील ४१ अनधिकृत इमारतींवर प्रशासनाचा हातोडा !

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारती तोडण्याची कारवाई वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने चालू केली आहे. २८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून मोठ्या पोलीस पहार्‍यात प्रशासनाने ही कारवाई चालू केली आहे.

आता दुचाकीवरील सहप्रवाशाला शिरस्त्राणाची सक्ती !

मोटार वाहन कायद्यातील तरतुदींप्रमाणे विनाशिरस्त्राण दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त अन् पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर मुख्यमंत्र्यांच्या नावाचे फलक !

देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील ‘सागर’ बंगल्याच्या बाहेर ‘फडणवीस : महाराष्ट्राचे सदैव मुख्यमंत्री’, असे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. फलकावरील चित्रात फडणवीस शपथ घेतांना दिसत आहेत.