पू. (सौ.) अश्विनीताई, कृतज्ञ आम्ही साधकजन आपल्या पावन सुकोमल चरणांशी

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा कार्तिक कृष्ण एकादशी (२६.११.२०२४) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने श्री. शंकर नरुटे यांनी अर्पण केलेले काव्यपुष्प ! 

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

विष्णुलोकातील श्रीविष्णूला (टीप १) केले साधनेने हो तुम्ही प्रसन्न ।
महालक्ष्मीची (टीप २) आज्ञा घेऊनी आलात देवद आश्रमात ।। १ ।।

श्री. शंकर नरुटे

आश्रमातील साधक जिवांचे घेता मातृत्व तुम्ही ।
देवत्वची प्रकटले हो या देवदरूपी देवलोकांत जणू ।। २ ।।

माय भवानी, आई भवानी दिसली आम्हा तुमच्या रूपातूनी ।
वात्सल्याचा केला वर्षाव आम्हा साधक जिवांवरी ।। ३ ।।

आश्रमी या देवत्व प्रकटले तुम्हा प्रयत्नांतूनी ।
धान्यविभागात धान्यलक्ष्मी आणि स्वयंपाकघरात अन्नपूर्णामाता यांचे दर्शन घडवले तुम्ही ।। ४ ।।

दोष-अहंच्या विळख्यातूनी सुटण्यासाठी मार्ग दाखवला तुम्ही ।
प्रीतीने तुमच्या आता भीती न राहिली कृतज्ञतेची पुष्पे उमलली मनी ।। ५ ।

सत्संगातूनी तुमच्या चैतन्य मिळाले अन् आश्रमदेवताही प्रसन्न झाली ।
आई, कृतज्ञ आम्ही साधकजन आपल्या
पावन सुकोमल चरणांशी ।। ६ ।।

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक