ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली

तीर्थक्षेत्रांच्या  ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.

केरळमधील काँग्रेस आणि साम्यवादी सरकारला शबरीमला यात्रा होऊ द्यायची नाही ! –  टी.बी. शेखर, राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्

शबरीमला मंदिरातील भगवान अय्यपा हे ‘चिन्मय’ मुद्रेमध्ये आहेत. त्यामुळे मंदिराच्या परंपरेनुसार या मंदिरात १० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील वय असलेलल्या महिलांना प्रवेश निषिद्ध आहे.

काशी विश्वेश्वर मंदिराच्या मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणार्‍या धर्मप्रेमींचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गौरव !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी ‘बाबा विश्वनाथकी जय’, ‘नम: पार्वतीपते हर हर महादेव’ या घोषणा दिल्या.

राहुल गांधी झाले लोकसभेचे विरोधी पक्षनेते

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘इंडि’ आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही घोषणा केली.

लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘अलविदा लाल सलाम’ पुस्‍तकाचे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या तिसर्‍या दिवशी झारखंडमधील रांची येथील ‘रांची सिटिजन फोरम’च्‍या उपाध्‍यक्षा डॉ. रेणुका तिवारी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

Gauri Lankesh Murder Case : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ३ आरोपींच्या जामीन अर्जाचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने राखून ठेवला !

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमित डेगवेकर, सुरेश एच्.एल्. उपाख्य टीचर आणि के.टी. नवीन कुमार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

Censor Board On Teesri Begum : धर्माच्या आधारे पक्षपात करणार्‍या चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचा चेहरा मला जगासमोर आणायचा आहे ! – के.सी. बोकाडिया

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणार्‍या चित्रपटांवर कोणताच आक्षेप न घेणारे चित्रपट परिनिरीक्षण मंडळ मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या विरोधातील चित्रपटांना विरोध करते आणि चित्रपटातून संबंधित दृश्ये किंवा संवाद वगळण्यास भाग पाडते.

Partition of Kerala : केरळची फाळणी करून स्‍वतंत्र ‘मलबार’ राज्‍य निर्माण करण्‍याची मुसलमान संघटनेची मागणी

उद्या अस राज्‍य स्‍थापन झाले, तर ही संघटना मलबारला स्‍वतंत्र देश घोषित करण्‍याचीही मागणी करील !

Bangladeshi Arrested : भारतात अवैधरित्या पारपत्र सिद्ध करून कुवेतमध्य ११ वर्षे रहाणार्‍या बांगलादेशीला अटक !

अवैध पारपत्र सिद्ध करणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !