विद्याधिराज सभागृह : वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तिसर्या दिवशी झारखंडमधील रांची येथील ‘रांची सिटिजन फोरम’च्या उपाध्यक्षा डॉ. रेणुका तिवारी यांनी लिहिलेल्या ‘अलविदा लाल सलाम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी व्यासपिठावर कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या आणि लेखिका डॉ. एस्.आर्. लीला, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर उपस्थित होत्या.