सातत्याने  येणार्‍या पुराच्या नियंत्रणासाठी ईशान्य भारतात ५० मोठे तलाव निर्माण करा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आदेश

तलावांद्वारे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे अल्प खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास, तसेच पूरस्थिती हाताळण्यासही साहाय्य होईल.

प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ई-केवायसी अपडेट करणे बंधनकारक !

लवकरात लवकर केवायसी भरला नाही, तर धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या मोहिमेतून बनावट शिधापत्रिकाधारक शोधण्यात येत आहेत.

‘नदी की पाठशाला’ निमित्ताने…

वाशिष्टी नदीच्या कुंभार्ली घाटातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील उगमाचा शोध घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, मान्यवरांच्या समोर वाशिष्टी नदी विषयक मनोगत व्यक्त करता आले.

हिंदु कुटुंबाच्या घरासमोर होणारे मदरसावर्ग त्वरित बंद करण्याचा पोलिसांचा आदेश !

२ दिवसांपूर्वी ससाणेनगर येथील हिंदु कुटुंबाला काही धर्मांधांकडून त्रास होत असल्याची बातमी ‘सुदर्शन मराठी’ या वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आली होती.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा हिंदु धर्मकार्यातील योगदानासाठी सत्कार !

समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने राजगडावर तिथीनुसार २० जून या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. १९ आणि २० जून असा २ दिवस हा कार्यक्रम होता.

बंगालमधून बांगलादेशाशी संबंधित आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याला अटक

बंगाल पोलिसांनी मीरपारा येथून महंमद हबीबुल्ला याला आतंकवाद्याला अटक केली. हबीबुल्ला हा बर्धमानमधील एका महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा अभ्यास करतो.

Indian Fishermen Arrested : श्रीलंकेच्या नौदलाकडून १८ भारतीय मासेमारांना अटक

एकीकडे श्रीलंकेचे राष्ट्रपती ‘भारतामुळे श्रीलंका आर्थिक संकटातून बाहेर पडू शकला’, असे म्हणतात; मात्र दुसरीकडे श्रीलंका भारतीय मासेमारांना अटक करतो !

Kanishka Blast : ‘कनिष्क’ विमानातील बाँबस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना कॅनडामध्ये वाहण्यात आली श्रद्धांजली !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनीही सामाजिक माध्यमांत पोस्ट करून आतंकवादावर टीका केली.

Sonakshi Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा !

या विवाहाला सामाजिक माध्यमांवरून विरोध केला जात होता. या पार्श्‍वभूमीवर पाटलीपुत्र येथे रस्त्याच्या कडेला मोठमोठे फलक लावून या विवाहाला विरोध केला जात आहे.

E-Medical Visa : बांगलादेशातून भारतात उपचारांसाठी येणार्‍या लोकांसाठी लवकरच ‘ई-मेडिकल व्हिसा’ सुविधा चालू होणार !

या योजनेचा लाभ बांगलादेशातील हिंदूंना होणार कि मुसलमानांना ?