५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला भोसरी (पुणे) येथील कु. दर्श टाव्हरे (वय १२ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. दर्श टाव्हरे हा या पिढीतील एक आहे !

नागरी सहकारी बँकांसमोरील अडचणींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा राज्य सरकारला अहवाल सादर !

राज्यातील नागरी सहकारी बँकांसमोरील अडचणींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या तज्ञ समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी १३ शिफारसी केल्या आहेत.

बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पडताळणी !

माजी आमदार के.पी. पाटील अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी (मद्यनिर्मिती उद्योग) प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून अचानक पडताळणी करण्यात आली.

तडसर (सांगली) येथील तलाठ्याला लाच घेतांना अटक !

तक्रारदार आणि त्यांचा पुतण्या यांनी एकमेकांना शेतभूमींची विक्री केली होती. त्याची सात-बारा नोंद करून उतारा देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना तालुक्यातील तडसर येथील तलाठी वैभव तारळेकर (वय ४५ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

अंगारकी चतुर्थीनिमित्त ‘श्री गणेशयागा’चे आयोजन !

अंगारकी चतुर्थीनिमित्त २५ जून या दिवशी ‘श्री गणेशयागा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘उपासनेला दृढ चालवावे’, या समर्थांच्या वचनाप्रमाणे श्री गणेशयागामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री शांतादुर्गादेवी आणि श्री रामनाथदेव यांना साकडे !

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा १२ वे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार आहे.