Sonakshi Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा !

  • हिंदु शिव भवानी सेनेने पाटलीपुत्र (बिहार) येथे लावले फलक

  • सोनाक्षी सिन्हा यांना बिहारमध्ये येऊ देणार नसल्याची धमकी !

हिंदु शिव भवानी सेनेने लावलेला फलक

पाटलीपुत्र (बिहार) – प्रसिद्ध अभिनेते तथा बंगालमधील आसनसोल मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी हिचा विवाह अभिनेता झहीर इक्बाल याच्याशी २३ जून या दिवशी नोंदणी पद्धतीने झाला. या विवाहाला सामाजिक माध्यमांवरून विरोध केला जात होता. या पार्श्‍वभूमीवर पाटलीपुत्र येथे रस्त्याच्या कडेला मोठमोठे फलक लावून या विवाहाला विरोध केला जात आहे. या विवाहाला ‘लव्ह जिहाद’ म्हणण्यात आले आहे. बिहारच्या हिंदु शिव भवानी सेनेने हे फलक लावून या विवाहाचा निषेध केला आहे. ‘शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीला बिहारमध्ये येऊ देणार नाही’, अशी चेतावणी या फलकांद्वारे देण्यात आली आहे.

पाटलीपुत्र येथे लावण्यात आलेल्या फलकांवर शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची छायाचित्रे आहेत. त्याखाली लिहिले आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न लव्ह जिहादला प्रोत्साहन देते. संपूर्ण देशाचे इस्लामीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा अन्यथा त्यांच्या मुलांची (लव आणि कुश) ही नावे आणि घराचे (रामायण) नाव पालटावे. हा विवाह हिंदु धर्माचा अपमान आहे.