|
हडपसर (जिल्हा पुणे) – २ दिवसांपूर्वी ससाणेनगर येथील हिंदु कुटुंबाला काही धर्मांधांकडून त्रास होत असल्याची बातमी ‘सुदर्शन मराठी’ या वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आली होती. या बातमीची नोंद घेत पोलिसांनी सदर हिंदु कुटुंबाच्या घरासमोर होणारे मदरसावर्ग संबंधितांना त्वरित बंद करण्याचा आदेश दिला. या हिंदु कुटुंबाचे बंद केलेले पाणी सोसायटीच्या अध्यक्षांना सांगून तात्काळ चालू करण्यात आले. अशा प्रकारे हिंदु कुटुंबाला न्याय मिळाला. त्यामुळे त्या हिंदु कुटुंबाने ‘सुदर्शन न्यूज’ आणि सर्व हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले (एका वृत्तवाहिनीने आवाज उठवल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली, अन्यथा ते निष्क्रीयच राहिले असते ! – संपादक)
काय आहे प्रकरण ?
हडपसर (पुणे) येथे वर्ष २०१७ पासून रहात असलेल्या हिंदु कुटुंबाचा तांबोळी नावाच्या मुसलमान व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात छळ केला जात होता. तांबोळी यांनी इमारतीतील ७ सदनिका विकत घेऊन त्या मुसलमान कुटुंबांना भाड्याने दिल्या आहेत. काही मुसलमान या इमारतीत मोठ्याने नमाजपठण करून आणि एकादशीला सदर हिंदु कुटुंबाच्या घरासमोर मांसाहार ठेऊन हिंदु कुटुंबाला मानसिक त्रास द्यायचे.