बंगालमधून बांगलादेशाशी संबंधित आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याला अटक

बंगाल पोलिसांनी महंमद हबीबुल्ला अटक केली.

बर्धमान (बंगाल) – बंगाल पोलिसांनी मीरपारा येथून महंमद हबीबुल्ला या आतंकवाद्याला अटक केली. हबीबुल्ला हा बर्धमानमधील एका महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा अभ्यास करतो. त्याचे ‘अन्सार-अल्-इस्लाम (बांगलादेश)’ नावाच्या संघटनेशी संबंधही समोर आले आहेत. त्याचा लॅपटॉप, भ्रमणभाष संच आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तो बंगालमधील बांगलादेशी आतंकवादी संघटनेच्या स्थानिक गटासाठी काम करत होता.

बंगाल पोलिसांनी पनागढ परिसरातून आणखी ५ जणांना कह्यात घेतले आहे. हबीबुल्लाच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नभाघाट परिसरातून या ५ जणांना कह्यात घेतले. ‘शहादत-ए-अल् हिकमा’ या आतंकवादी संघटनेसमवेत या सर्वांचे संबंध असल्याचेही समोर आले आहे. या सर्व संघटना ‘अल् कायदा’शी संलग्न आहेत.