Indian Fishermen Arrested : श्रीलंकेच्या नौदलाकडून १८ भारतीय मासेमारांना अटक

यावषी आतापर्यंत १८२ भारतीय मासेमारांना अटक !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने त्याच्या सागरी सीमेमध्ये अवैधपणे मासेमारी केल्याच्या प्रकरणी १८ भारतीय मासेमारांना अटक केली आहे, तसेच ३ मासेमारी नौका जप्त करण्यात आल्या आहेत. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन गयन विक्रमसूर्या यांनी सांगितले की, अटक केलेल्या मासेमारांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कांकेरसंथुराई बंदरात नेण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या नौदलाने अशाच आरोपाखाली ४ भारतीय मासेमारांना अटक करून त्यांच्या नौका जप्त केल्या होत्या. नौदलाने सांगितले की, वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत १८२ भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या २५ नौका जप्त केल्या आहेत. गेल्या वर्षी २४५ जणांना अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

एकीकडे श्रीलंकेचे राष्ट्रपती ‘भारतामुळे श्रीलंका आर्थिक संकटातून बाहेर पडू शकला’, असे म्हणतात; मात्र दुसरीकडे श्रीलंका भारतीय मासेमारांना अटक करतो, हे लक्षात घ्या !