Gulabrao Patil Family Car Incident : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला धर्माधांकडून शिवीगाळ आणि गाडीतील चालकाला दमदाटी !

हिंदूंचा उद्रेक झाल्याने गाड्यांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ !

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याने त्या भागातील हिंदूंचा झालेला उद्रेक !

पाळधी : ३१ डिसेंबरच्या रात्री पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी चारचाकी वाहनातून पाळधी येथून जात असतांना काही धर्मांध वाटेत उभे होते. या वेळी रस्त्यातून जाण्यासाठी जागा होण्यासाठी गाडीतील चालकाने रस्ता रिकामा होण्यासाठी गाडीचा ‘हॉर्न’ वाजवला. यानंतरही धर्मांधांनी गाडी पुढे जाण्यास जागा दिली नाही. यानंतर चालकाने गाडीच्या बाहेर येऊन समजावण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधांचा जमाव चालकाच्या अंगावर धावून गेला आणि गाडीत असणार्‍या गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिविगाळ केली. यापूर्वींही धर्मांधांकडून असे प्रकार घडले होते. (धर्मांध हिंदु महिला-मुली यांची छेड काढतात, तरी त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई कशी केली नाही ? – संपादक)  

जाळपोळ करण्यात आलेली दुकाने, वाहने

यामुळे त्या भागातील हिंदूंचा उद्रेक झाला आणि त्यातून त्यांनी उद्दाम झालेल्या धर्मांधांच्या गाड्यांची तोडफोड केली, तसेच काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली.

१. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी एक दिवसाची संचारबंदी घोषित केली आहे.

२. या संदर्भात तेथील काही हिंदूंनी सांगितले की, पाळधी परिसरात अनेक दिवसांपासून धर्मांधांचा त्रास होत आहे. यात हिंदु युवती-महिला यांची छेड काढणे, हिंदूंना शिविगाळ करणे, त्यांना त्रास देणे, रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांना धर्मांधांच्या भागातून जाण्यास मज्जाव करणे, जाणार्‍या-येणार्‍या वाहनांमधील प्रवाशांना त्रास देणे असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत.

३. अंततः लोकप्रतिनिधींच्या संदर्भातच हा प्रकार घडल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हिंदूंमध्ये खदखदत असलेल्या असंतोषाचा उद्रेक झाला आणि त्यातून हा प्रकार घडला. या प्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

संपादकीय भूमिका

मंत्र्याच्या पत्नीशीही उद्दामपणे वागणारे धर्मांध ! अशांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळे ते अशा कृती करत आहेत. त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस काय कृती करणार ?