प्रयागराज – कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याविषयी केवळ मागणी करता येईल; मात्र भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हे सरकारच्या हातात आहे. सरकार पाहिजे तेव्हा भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू शकते, असे वक्तव्य आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद यांनी केले. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचा ठराव महाकुंभळ्यामध्ये होणार्या धर्मसंसदेत करण्यात येणार का ? याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महंत शंकरानंद सरस्वती यांनी वरील वक्तव्य केले.
१. महाकुंभमेळ्यामध्ये मुसलमानांना दुकानाला जागा देण्याविषयी उत्तरप्रदेश शासनाने घेतलेल्या निर्णयाविषयी पत्रकारांनी विचारले असता महंत शंकरानंद स्वरस्वती म्हणाले, ‘‘कुणी मुसलमान म्हणून आमचा विरोधी नाही; मात्र जे आमच्या श्रद्धेशी सुसंगत नसेल, तर अशांपासून कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी काही प्रतिबंध आवश्यक आहेत.’’
२. महाकुंभमध्ये आयोजित धर्मसंसदेच्या उद्देशाविषयी महंत शंकरानंद सरस्वती म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र या संकल्पनेवर चर्चा होण्यासाठी धर्मसंसदेची आवश्यकतात आहे. धर्मसंसद हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. त्याचे राजकारण होता कामा नये. धर्म, संस्कृती आणि श्रद्धा यांचे रक्षण होण्यासाठी धर्मसंसदेची आवश्यकता आहे. धर्म आणि राजकारण वेगवेगळे ठेवायला हवे. महाकुंभच्या आयोजनामध्ये सर्वच सहभागी व्हायला हवेे.’’
३. गंगेच्या पाविष्याविषयी महंत शंकरानंद म्हणाले, ‘‘गंगेचे पाणी मूलत: शुद्ध आणि स्नान करण्यायोग्य आहे. असे असले, तरी गंगामातेच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.’’
४. पुजार्यांना मासिक वेतन देण्याविषयी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची घोषणा राजकीय आहे. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या घेषणा केल्या जातात, असे महंत शंकरानंद म्हणाले.
५. संभल येथील हिंसचारातील पीडितांना अखिलेश यादव यांनी केलेले आर्थिक साहाय्य राजकीय उद्देशनाने असल्याचेही यावेळी महंत शंकरानंद सरस्वती म्हणाले.