कीव (युक्रेन) – युक्रेनने ड्रोनद्वारे हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागून काळ्या समुद्रात रशियाचे ‘एम्आय-८’ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. क्रिमियामधील तारखानकुटजवळ ३१ डिसेंबरला हा प्रकार घडला.
🔥 Ukraine-Russia War Update: 🚁💥
🌊⚔️A Russian helicopter has been shot down in a historic sea drone strike
Ukraine halts pipeline carrying Russian natural gas to Europe, as deal expires. #UkraineRussiaWar #SeaDroneStrike pic.twitter.com/M2zfo33aGj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 1, 2025
युक्रेनच्या म्हणण्यानुसार त्याच्या सैन्याने ड्रोनद्वारे आक्रमण करून रशियाचे हेलिकॉप्टर पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आक्रमणासाठी ‘आर्-७३ (एए-११ आर्चर) हे क्षेपणास्त्र वापरले गेले, ज्याला ‘सी ड्रॅगन’ असे नाव देण्यात आले आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे, ज्यामध्ये ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र डागतांना आणि हेलिकॉप्टर पडतांना दिसत आहे.