जळगाव – येथील पिंप्राळा परिसरात घरगुती वापराचा गॅस सिलिंडर अवैधरित्या वाहनात भरत असल्याची माहिती मिळताच जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. यात वसीम चंगा शहा, अकलाख खान जहांगीर खान, फिरोज अलाउद्दीन शेख आणि जुबेर खान उस्मान खान पठाण या ४ जणांना घरगुती गॅसचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले. (अल्पसंख्य धर्मांध लोकसंख्येत मात्र बहुसंख्य ! – संपादक) त्यांच्याकडून एकूण ११ घरगुती गॅस सिलिंडर, ५ मोटारी, गॅस भरण्याचे साधन आणि २ वजन काटे जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत २ लाख १ सहस्र रुपये इतकी आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.