मुंबईत २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त !
मुंबई – गुजरातमधून गुटखा घेऊन मुंबईत आलेले २ टेंपो टिळकनगर पोलिसांनी घाटकोपरच्या छेडानगर परिसरातून कह्यात घेतले. या दोन्ही टेंपोचालकांना अटक करून पोलिसांनी २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. (राज्यात गुटखाबंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा आणणार्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)
गांजाची तस्करी करणारा धर्मांध रिक्शाचालक अटकेत !
मुंबई – शहरात अनेक ठिकाणी ३१ डिसेंबरच्या निमित्त मेजवान्यांचे आयोजन करण्यात आले होते. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घाटकोपरमधील अमृतनगर परिसरात एक रिक्शाचालक गांजाची विक्री करत असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली. त्यानुसार या परिसरात पहाणी करत असतांना पोलिसांना रिक्शाचालक जाफर अन्सारी (वय ४४ वर्षे) संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे दीडशे ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी जाफर अन्सारीवर या प्रकरणी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिका : गुन्हेगारीत अग्रेसर असणारे धर्मांध !
ऑनलाईन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ ८ दिवसांपासून बंद; कामकाज ठप्प
वसई – शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबवण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे; मात्र मागील ८ दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे (‘आर्.सी.एम्.एस्.’चे) संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे वसईत शिधापत्रिकेच्या संबंधित एक सहस्रहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. या संकेतस्थळाच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार दिली आहे. शासनाने यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर संकेतस्थळ चालू करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची आवश्यकता ! – सुजाता सौनिक, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक त्या कामांचे सूक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा सिद्ध करावा, प्रयागराजला भेट देऊन स्थानिक अधिकार्यांनी कुंभमेळ्याच्या सिद्धतेचा अभ्यास करावा, शहरातील गोदावरीचा काठ हरित करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा विविध सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.