B’deshi Infiltrator Becomes TMC Panchayat Sarpanch : बंगालमध्ये घुसखोर मुसलमान महिला बनली ग्रामपंचायतीची सरपंच !

कोलकाता उच्च न्यायालयात खटला

बंगालमधील रशिदाबाद ग्रामपंचायतीची सरपंच लवली खातून

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील रशिदाबाद ग्रामपंचायतीची सरपंच लवली खातून हिच्या नागरिकत्वाचा वाद अधिकच गडद झाला आहे. मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील रशिदाबाद ग्रामपंचायतीची प्रमुख लवली खातून ही बांगलादेशी घुसखोर असल्याचे बोलले जात आहे. पारपत्राविना भारतात प्रवेश केल्याचा तिच्यावर आरोप आहे. लवली खातून हिचे खरे नाव नसिया शेख असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने प्रशासनाकडून अहवालही मागवला आहे.

१. चंचल येथील रहिवासी असलेल्या रेहाना सुलताना यांनी वर्ष २०२४ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. रेहाना यांनी वर्ष २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती; पण त्या लवली खातून हिच्याकडून पराभूत झाल्या होत्या. खातून हिने निवडणूक जिंकल्यानंतर एक-दोन महिन्यांतच तिने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

२. वर्ष २०१५ मध्ये खातून हिच्या नावाने आधारकार्ड आणि वर्ष २०१८ मध्ये जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते; मात्र ही सर्व कागदपत्रे बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचा आरोप आहे. याचिकाकर्त्याचा दावा आहे की, खातूनने तिचे नाव आणि अधिकृत नोंदी पालटण्यासह तिची ओळख पालटल्याचे सिद्ध करणारे पुरावे आहेत.

३. रेहाना यांच्या अधिवक्त्या भादुरी म्हणाल्या की, आम्ही स्थानिक पोलीस ठाणे आणि प्रशासन यांच्याकडे तक्रार केली; मात्र कारवाई झाली नाही, म्हणून आम्ही वर्ष २०२४ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली.

संपादकीय भूमिका

हे तृणमूल काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! बांगलादेशी घुसखोरांना सरकारांकडून साहाय्य मिळत असेल, तर अशा घुसखोरांना बाहेर कोण काढणार ?