(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
नाशिक – गोदाघाट परिसरातील स्वयंभू कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शनाला येणार्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातील फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.
देशभरात कपालेश्वर महादेव हे एकमेव मंदिर आहे, ज्या ठिकाणी शिवासमोर नंदी नाही. येथे प्रत्यक्ष शिवाला ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्तता मिळाल्याची आख्यायिका आहे. या निर्णयामुळे मंदिर विश्वस्तांचे शहरात विविध स्तरांवरून कौतुक होत आहे. भाविकांचाही याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
अशोभनीय असांस्कृतिक कृतींमुळे भाविक त्रस्त असल्याने वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला ! – अक्षय कलंत्री, मंदिर विश्वस्तमध्यंतरीच्या काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणांकडून मंदिराच्या परिसरात व्हिडिओज बनवणे, तोकडे कपडे परिधान करून येणे अशा अशोभनीय असांस्कृतिक कृतींमुळे भाविक त्रस्त झाले होते. याविषयी अनेक तक्रारी मंदिर प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि विश्वस्त यांनी निर्णय घेतला. |
संपादकीय भूमिकावस्त्रसंहिता लागू करणार्या कपालेश्वर देवस्थानचे अभिनंदन. अन्यत्रच्या देवस्थान मंडळांनीही याचा आदर्श घ्यावा ! |