तेलंगाणामध्ये सौर प्रकल्पासाठी सरकारी भूमीऐवजी चर्च आणि वक्फ यांच्या भूमीचा वापर करावा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची सरकारकडे मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा सरकारने राज्याच्या ५ जिल्ह्यांतील २३० एकर भूमी सौर प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटन यांनी भाग्यनगर आणि रंगा रेड्डी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देऊन या प्रकल्पासाठी वक्फ बोर्ड आणि चर्च यांची भूमी वापरण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. या देशात सहस्रो एकर वक्फ भूमी आणि चर्चची ओसाड असलेली भूमी यांचा वापर सरकारने त्यांच्या प्रकल्पांसाठी करावा.

२. आतापर्यंत तेलंगाणामध्ये मंदिरांची सुमारे २५ सहस्र एकर भूमी कह्यात घेण्यात आली आहे. ही भूमी परत आणण्यासाठी सरकार कायदेशीर प्रक्रिया करत नाही. संपूर्ण हिंदु समाजाने याचा निषेध केला पाहिजे आणि मंदिरांना प्रार्थनास्थळांमध्ये रूपांतरित करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

३. तेलंगाणा सरकार मुल्ला, मौलवी, चर्च यांच्या पालकांना वेतन देते. देखभालीसाठी लाखो रुपये दिले जातात; पण सरकार त्यांच्या भूमीला हात लावत नाही. सरकार केवळ हिंदूंच्या मंदिरांची भूमी बळकावतात.

संपादकीय भूमिका

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. ही मागणी लावून धरण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !