धर्मांध मुसलमानाकडून महाकुंभपर्वात घातपात घडवण्याची धमकी !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘तुम्ही सर्व, तुम्ही सर्व गुन्हेगार आहात. महाकुंभात बाँबस्फोट करणार. १ सहस्र हिंदूंना मारणार. ‘अल्ला इज ग्रेट’ (अल्ला महान आहे)’, अशी धमकी ‘एक्स’वरील नसर पठाण नावाच्या खात्यावरून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर या दिवशी विपिन गौर नावाच्या तरुणाने उत्तरप्रदेश पोलिसांना याची माहिती दिली. ‘या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध चालू केला आहे’, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी दिली. यापूर्वी अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने महाकुंभ मेळ्यावर आक्रमण करण्याची धमकी दिली होती.
🚨👮♂️ A disturbing threat has been made against the #MahaKumbh2025 in Prayagraj, with a fanatic bigot claiming “1,000 Hindus will be killed, Allah is great”. 🙅♂️
This has raised alarm among security agencies, and it’s crucial that the Police take this threat seriously and stay… pic.twitter.com/TULUzymiBY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 2, 2025
धमकी देणार्या व्यक्तीने त्याच्या खात्यावरील परिचयामध्ये लिहिले की, ‘मला मुसलमान असल्याचा अभिमान आहे.’ तसेच त्याने हिंदूंविरुद्ध अश्लाघ्य भाषेत टीकाही केली. या खात्यावर एका युवकाचे छायाचित्र असून त्याच्या खांद्यावर पिशवी आहे. या युवकाने तो बिहारच्या पूर्णिया येथील भवानीपूरचा रहिवासी असल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिकामहाकुंभपर्वामध्ये घातपात करण्यात येण्याचा प्रयत्न केला जात असल्याची गुप्तचरांकडून माहिती देण्यात येत असल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी अशा धमक्यांकडे गांभीर्याने पहात सतर्क रहाणे आणि अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! |