Burqa Banned In Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यावर बंदी !

बर्न (स्वित्झर्लंड) – १ जानेवारी २०२५ पासून स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र), बुरखा किंवा इतर कोणतेही साधन वापरून चेहरा झाकणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याच्या अंतर्गत सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही. या कायद्याचे उल्लंघन केल्यास अंदाजे ९६ सहस्र रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

स्वित्झर्लंडपूर्वी बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरिया इत्यादी देशांमध्येही याविषयी कायदे करण्यात आले आहेत. वर्ष २०२२ मध्ये स्विस संसदेने महिलांना चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर मतदान केले होते. या वेळी १५१ सदस्यांनी बाजूने तर २९ सदस्यांनी विरोधात मतदान केले होते. त्यानंतर याविषयी कायदा संमत करण्यात आला. यापूर्वी २००९ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जनमत चाचणीद्वारेच मिनार (मशिदीच्या आजूबाजूला बांधण्यात येणारे मनोरे) बांधण्यावर बंदी घालण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

स्वित्झर्लंडसारखा धर्मनरिपेक्षतावादी आणि सुधारणावादी देश असा कायदा करू शकतो, तर भारतात असा कायदा का बनवला जात नाही ?