माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग सार्वत्रिक निवडणूक लढवू शकतो ! – बांगलादेशाचे मुख्य निवडणूक आयुक्त

माजी पंतप्रधान शेख हसीना आणि महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सिद्धता चालू केली आहे. बांगलादेशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ए.एम्.एम्. नसीरुद्दीन यांनी सांगितले की, जोपर्यंत अंतरिम सरकार किंवा न्यायपालिका बंदी घालत नाही, तोपर्यंत माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊ शकतो. चितगाव येथे निवडणूक अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीच्या वेळी नसीरुद्दीन म्हणाले की, निवडणूक आयोग निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी सर्व पावले उचलत आहे. (निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. यासाठी नसीरुद्दीन काय करणार आहेत ? – संपादक)

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी १६ डिसेंबर या दिवशी त्यांच्या विजयदिनाच्या भाषणात वर्ष २०२६ च्या आरंभी निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिले होते.