राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड !

भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा यांनी पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केले असून ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते.

सातारा येथे काँग्रेसचे भ्रष्ट खासदार साहू यांच्या पुतळ्याचे दहन !

सातारा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वात शिवतीर्थावर (पोवई नाका) आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आले.

ममदापूर (अहिल्यानगर) येथील पशूवधगृह बंद करून कारवाईची नगर पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी !

ममदापूर (अहिल्यानगर) येथे पशूवधगृहातील कसायांवर कारवाई करण्यासाठी गेलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यावर काही धर्मांधांच्या जमावाकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. यामधे एक तरुण आणि पोलीस अधिकारी गंभीर घायाळ झाले.

पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण !

पोलिसांचा धाक न उरल्याचे हे द्योतक आहे. पोलीस याविषयी आत्मपरीक्षण करतील का ?

 सासवड (पुणे) येथे कपाळावर टिळा लावणार्‍या विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार आचरण करण्यास धर्मांध शिक्षिकेकडून अटकाव !

हिंदु धर्माच्या विरोधात बोलणार्‍यांना क्षमा मागायला लावणार्‍या सतर्क हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

सरकारला आता ‘पेन्शन’ नव्हे ‘टेन्शन’ देण्याची आवश्यकता ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीला दिला पाठिंबा !

विकृतीचे समर्थन घातकच !

पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी या समलिंगी जोडप्याने त्यांचा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम पुणे येथे नुकताच साजरा केला.

चिंचवड (पुणे) येथील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर (चिंचवड) येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांद्वारे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.

घोटाळे करणार्‍या चर्चचे सरकारीकरण कधी करणार ?

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती स्वयंसेवी संघटना ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ हिचा परदेशातून देणगी घेण्याचा एफ्.सी.आर्.ए. परवाना रहित केला आहे.