जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीला दिला पाठिंबा !
नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – मी जर मुख्यमंत्री असतो, तर सरकारी कर्मचार्यांना जुन्या निवृत्ती वेतनासाठी (‘पेन्शन’साठी) आंदोलन करावेच लागले नसते. सरकारला आता ‘पेन्शन’ नव्हे, तर ‘टेन्शन’ देण्याची आवश्यकता आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे केली. शहरातील यशवंत मैदानात चालू असलेल्या जुन्या निवृत्ती वेतन आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आंदोलकांनी घोषणा दिल्या, तसेच या वेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असतांना ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. सरकारी कर्मचार्यांचे योगदान मला ठाऊक आहे. कोरोनानंतर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करता येईल कि नाही, याविषयी चर्चा चालूच झाली होती; मात्र गद्दारांनी गद्दारी करून आपले सरकार पाडले. आम्ही धोरण बनवतो, तुम्ही अमलात आणता. हे अवैध सरकार आहे. तुम्हाला तुमच्या हक्कासाठी आक्रोश करावा लागत आहे. निवडणुका येत आहेत. वर्ष २०१४ प्रमाणे पुन्हा तुम्हाला फसवले जाईल. १५ लाख आले का ? अच्छे दिन आले का ?
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, वर्ष २०२४ मध्ये आमचे सरकार येणार आहे. आम्ही जुने निवृत्ती वेतन योजना लागू करणार आहे.