हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे धर्मांध शिक्षिकेने मागितली क्षमा !

सासवड (जिल्हा पुणे) – येथील गावातील आणि पंचक्रोशीतील काही महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांची ९ डिसेंबर या दिवशी ‘पुरंदर ज्युनिअर कॉलेज सासवड’ याविषयी तक्रार आली होती. या महाविद्यालयातील जे विद्यार्थी कपाळावर टिळा लावून जात होते त्यांना महाविद्यालयामधील काझी या शिक्षिकेने, ‘तुम्ही टिळा का लावता ?, तुम्ही दोन दोन घंटे रांगेत उभे राहून दर्शनाला का थांबता ? तुम्ही दगडाच्या पाया पडू नका’, असे हिंदु धर्माविषयी अनेक प्रश्न आणि विधाने या शिक्षिकेने वर्गामध्ये केली. हे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त वेगळे प्रश्न होते, हे लक्षात येताच या गावातील हिंदु संघटनेचे कार्यकर्ते संतोष खेडेकर, जीवन खेडेकर आणि विशाल खेडेकर, सागर मोकाशी, तसेच अन्य तरुण यांनी ११ डिसेंबरला त्वरित महाविद्यालयात जाऊन सदर महाविद्यालयाचे प्राचार्यांना भेटले. त्यांच्यासमोर त्या शिक्षिकेने धर्माविषयी केलेले हे वक्तव्य कसे चुकीचे आहे, हे सिद्ध केले. त्या शिक्षिकेला त्याच विद्यार्थ्यांसमोर चुकीच्या केलेल्या वक्तव्यावर क्षमा मागायला, तसेच ‘यानंतर कोणत्याही धर्माविषयी मी असे वक्तव्य करणार नाही’, असे जाहीरपणे सांगायला भाग पाडले.
संपादकीय भूमिका
|
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा