कोणत्याही परिस्थितीत विशाळगडाचे पावित्र्य राखले जाईल ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

विशाळगड

कोल्हापूर, ७ जानेवारी (वार्ता.) – अटी-शर्ती घालून विशाळगड पर्यटक, भाविक यांच्यासाठी पोलिसांच्या अहवालानुसार खुला करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत विशाळगडाचे पावित्र्य राखले जाईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरातत्व विभागाने गडावरील अतिक्रमणांची सुनावणी घेऊन ती पूर्ण केली आहे. अतिक्रमणधारकांचे म्हणणे विभागाने घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाकडून कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे पत्रकारांना म्हणाले.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘गडावर कोणताही कार्यक्रम संबंधित यंत्रणेची अनुमती घेऊनच करावा लागेल. विशाळगडावर प्रतिवर्षी उरूसाच्या संदर्भात आवेदन आले तर पोलीस यंत्रणेचा अहवाल घेऊन निर्णय घेतला जाईल. गडावरील समाधी, मंदिरांची दुरुस्ती, अन्य डागडुजी याच्या संदर्भात पुरातत्व विभागाचे काम चालू आहे. पुढील टप्प्याचा मसुदाही सादर केल्यावर त्याचेही काम चालू होईल.’’