अमरावती – उस्मानिया मस्जीद येथील दारुल ऊलूम मदरशात शिकणार्या १३ वर्षांच्या बालकाला अश्लील व्हिडिओ दाखवून मौलानाने (इस्लामचा अभ्यासक (विद्वान)) त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. ६ जानेवारी या दिवशी न्यायालयाने मौलाना सलमान मुफ्ती (वय ३८ वर्षे, रहाणार बिच्छु टेकडी) याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेत कोतवाली पोलिसांनी बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून मौलानाला अटक केली.
हात-पाय बांधून अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार केले
मदरशामध्ये १३ वर्षीय बालक ऑक्टोबर २०२४ पासून शिक्षणासाठी रहात आहे. २ जानेवारीला रात्री पीडित बालक लघुशंकेसाठी खोलीच्या बाहेर आला, तेव्हा मौलानाने त्याला हाक मारली. मुलगा खोलीत गेल्यावर मौलानाने बालकाला जवळ ओढले आणि पलंगावर झोपवून त्याचे दोन्ही हात-पाय बांधले. त्याला अश्लील व्हिडिओ दाखवत त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले.
मदरशात पाठवल्यास आत्महत्या करण्याची मुलाची मानसिकता
या प्रकारानंतर मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरी गेला. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला, तसेच ‘यापुढे मदरशात शिकायला जाणार नाही आणि बळजोरीने पाठवले, तर आत्महत्या करणार’, असे त्याने आई-वडिलांना सांगितले. यानंतर पालकांनी मदरशातील मौलानाला खडसावले आणि कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद करून मौलाना सलमान मुफ्तीला अटक केली. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिका :
|