प्रयागराज – कुंभमेळ्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी घातपात करण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर बाँब शोधक आणि नाशक पथकाद्वारे संपूर्ण महाकुंभक्षेत्राची पडताळणी चालू करण्यात आली आहे. महाकुंभक्षेत्रातील सर्व दुकाने, आखाड्यांचे मंडप, वाहने, वाळूचे ढिगारे, कचर्याचे डबे आदी सर्व ठिकाणी बाँब शोधक पथक पडताळणी करत आहे. नियमित ३६ बाँबशोधक पथकांद्वारे ही पडताळणी केली जात आहे.
सद्य:स्थितीत महाकुंभक्षेत्रात सहस्रावधी दुकाने आणि शेकडो आश्रम वसवण्यात आले आहेत. या सर्वांची बाँबशोधक पथकाद्वारे टप्प्याटप्प्याने पडताळणी केली जात आहे. कुंभक्षेत्रात ठिकठिकाणी तात्पुरती साहाय्यता केंद्रे उभारण्यात आली आहेत. अक्षयवट, लेटे मारुती, नागवासुकी मंदिर, त्रिवेणी संगम आदी महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यांसह २४ तास पोलीस पथके ठेवण्यात आली आहेत.