
जयपूर (राजस्थान) : भाजपने राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. तसेच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. ५६ वर्षीय भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा यांनी पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केले असून ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते. भजनलाल शर्मा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. तसेच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काही काळ काम केलेले आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशप्रमाणे नवीन चेहरा येथेही निवडण्यात आला.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !