७ जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
पुणे – लष्कर न्यायालयात सराईत चोरट्याला जामीन देण्यासाठी बनावट (खोट्या) कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघड केला. या प्रकरणी संतोष तेलंगसह ७ जणांवर गुन्हा नोंद करून पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
सराईत चोरटा बच्चनसिंह भोड याला कोंढवा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भोंडविरोधात ४ गुन्हे नोंद आहेत. यात भोंडला जामीन मिळवून देण्यासाठी लष्कर न्यायालयातील एका अधिवक्त्यांकडून तेलंग आणि त्याच्या साथीदारांनी आधारकार्ड, शिधापत्रिका ही कागदपत्रे सादर केली. त्याची पडताळणी केल्यावर ती बनावट असल्याचे उघड झाले.
संपादकीय भूमिका :गुन्हेगारांची मजल पोलिसांत महत्त्वाची कागदपत्रेही बनावट देण्यापर्यंत गेली आहे, हे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांचा वचक नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, हे दुर्दैवी ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |