
गडचिरोली – एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम भाग असलेल्या टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्यामुळे नक्षलवाद्यांनी गावचे पाटील लालसू वेलदा (वय ६३ वर्षे) यांची हत्या केली. २३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तेथे पत्रक टाकले असून त्यात हत्येचे दायित्व त्यांनी स्वीकारले आहे. यासह त्यांनी पोलिसांसह स्थानिक नेते यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
‘आदिवासी जल, जंगल, भूमी वाचवण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत, तर हा आवाज दाबण्यासाठी काही लोक जनविरोधी कामे करत आहेत. लवकर सुधारा, अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही’, अशा शब्दांत नक्षलवाद्यांनी खाण समर्थकांना पत्रकातून धमकी दिली आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान