India’s First Glass Bridge : देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन

कन्याकुमारी (तमिळनाडू) – तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला काचेचा पूल पूर्ण झाला आहे. ७७ मीटर लांब आणि १० मीटर रुंद असलेल्या या पुलाचे नुकतेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या पुलाच्या बांधकामामुळे पर्यटकांना कन्याकुमारीच्या काठावरील ‘विवेकानंद रॉक मेमोरियल’ येथून थेट १३३ फूट उंच तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोचता येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. या उद्घाटनाच्या वेळी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, राज्याचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.