इस्लामी देशांच्या संघटनेकडून तालिबानवर महिलांना शिक्षण देणे चालू करण्यासाठी दबाव !

परिस्थिती पाहून निर्णय घेईपर्यंत धीर धरण्याचा तालिबानचा सल्ला !

अंबाला (हरियाणा) येथे भारतीय सैनिकाची हत्या !

पत्नीला व्हॉट्स वर आला संदेश ‘तुमच्या पतीला देवाकडे पाठवले, पाकिस्तान झिंदाबाद !’

भारत अवकाशात जगातील तिसरे अंतराळ स्थानक उभारणार !

भारताच्या अंतराळ स्थानकाची घोषणा वर्ष २०१९ मध्ये इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केली होती. ‘गगनयान मोहिमेनंतर भारत वर्ष २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करील’, असेही सांगण्यात आले.

लोक मांसाहार करत असल्याने हिमाचल प्रदेशमध्ये होत आहे ढगफुटी आणि भूस्खलन !

मंडी (हिमाचल प्रदेश) येथील आयआयटीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांचा दावा  !

समलैंगिक संबंध ठेवणार्‍या मुसलमान शिक्षकाची पीडित अल्पवयीन विद्यार्थ्याकडून गळा चिरून हत्या !

मदरशांमध्ये मुलांचेही लैंगिक शोषण केले जात असल्याच्या घटना यापूर्वी उघड झाल्या आहेत. सरकारने ‘अशा घटना घडत आहेत का ?’, याची पोलिसांद्वारे आधीच चौकशी केली, तर पुढील अनर्थ टळू शकते !

गोवा : म्हार्दोळ पोलीस निरीक्षकांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा पोलीस महासंचालकांचा आदेश

‘या घटनेत पुरावे नष्ट केले, चुकीची माहिती दिली, मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आदी सर्व प्रकार म्हार्दोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झाले, तरीही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.’ उच्च न्यायालयाच्या या टिपणीनंतर पोलिसांनी आदेश दिला आहे.

गोवा : प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री केल्यास कठोर कारवाई करणार !

वर्ष २०१३ पासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीवर गोव्यात बंदी असूनही १०० टक्के बंदीची कार्यवाही न होणे पर्यावरणासाठी धोकादायक असण्याबरोबरच ही स्थिती प्रशासनासाठी लज्जास्पद !

गोवा : धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

मद्याच्या धुंदीत असे कृत्य केल्याचे काँग्रेसवाले सांगतील; पण त्यांना मद्यधुंद अवस्थेत जन्माष्टमीचेच फलक फाडण्याचे भान कसे रहाते ? सरकारने याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी !

गोवा : यापुढे हातात राखी बांधून शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना अनुमती असेल ! – व्यवस्थापनाचा पालकांना संदेश

राख्या काढण्यास सांगणार्‍या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई  केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.

ओबीसींच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्‍याविना स्‍वस्‍थ बसणार नाही, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ सप्‍टेंबर या दिवशी स्‍पष्‍ट केले.