आम्‍ही ‘भारतीय’ आहोत, ‘इंडियन’नाही ! – कंगना राणावत, अभिनेत्री

भारताविषयी असा अभिमान किती खेळाडू आणि अभिनेते यांना आहे ?, याचे निरीक्षण करा !

सातारा जिल्‍ह्यात लंपी आजारामुळे १३ गुरांचा मृत्‍यू !

पहिल्‍या लाटेत जिल्‍ह्यातील २० सहस्रांहून अधिक पशूधन बाधित झाले होते, तर १ सहस्र ४८० गुरांचा मृत्‍यू झाला होता.

मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जनास प्रशासनाची अनुमती !

श्रीमंत राजेसाहेबांनी काही दिवसांपूर्वी तलावातील सर्व फाटकांना लावलेले कुलूप श्री गणेशभक्‍तांनी तोडल्‍याने निर्माण झालेला तंटा यामुळे मिटला.

‘इंस्‍टाग्राम’वर देवतांचा अवमान करणार्‍या धर्मांधावर अहिल्‍यानगर येथे गुन्‍हा नोंद !

स्‍वतःच्‍या धर्माविषयी कट्टर असणारे धर्मांध, हिंदु धर्माचा वारंवार, सहजपणे अवमान करतात, हे संतापजनक आहे. देवतांचा अवमान रोखण्‍यासाठीचा कठोर कायदा व्‍हावा; म्‍हणून लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का ?

छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाइकांकडून आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना मारहाण !

जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात (मिनी घाटी) ३ सप्‍टेंबर या दिवशी दुपारी अभिजित गजिले (वय २१ वर्षे) यांचा मृत्‍यू झाला. यामुळे संतप्‍त झालेल्‍या नातेवाईकांनी अतीदक्षता विभागाच्‍या काचा फोडून आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना मारहाण केली.

सातारा येथे सख्‍ख्‍या भावाकडून अल्‍पवयीन बहिणीवर अत्‍याचार !

कोरेगाव तालुक्‍यातील एका गावात सख्‍ख्‍या भावाने अल्‍पवयीन बहिणीवर अत्‍याचार केले. याविषयी वाठार-स्‍टेशन पोलिसांनी सांगितले की, पीडित अल्‍पवयीन मुलीचे शिक्षण इयत्ता ७ वीपर्यंत झाले आहे.

अपहरणकर्त्‍यांच्‍या शोधासाठी पोलिसांची ८ पथके रवाना !

शहरातील बांधकाम व्‍यावसायिक हेमंत पारख यांचे अज्ञात व्‍यक्‍तींनी २ सप्‍टेंबर या दिवशी त्‍यांच्‍या रहात्‍या घराजवळून अपहरण केले होते. त्‍यानंतर काही घंट्यांतच पारख हे सुखरूप घरी पोचले; मात्र अपहरणकर्त्‍यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

अयोध्‍येला पर्यटन केंद्र नव्‍हे, तर हिंदूंचे धार्मिक शिक्षण केंद्र बनवा ! 

अयोध्‍येत सध्‍या ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्‍प उभारून अयोध्‍येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्‍याचे सरकारचे ध्‍येय आहे.

सर्वच क्षेत्रांतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा !

‘राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, फक्त स्वतःच्या क्षेत्रातीलच नको, तर व्यापक होण्यासाठी वैद्यकीय, न्यायालयीन, पोलीस, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच क्षेत्रांतील अन्याय शोधून त्याविरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले