महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार होणार !

केंद्र आणि राज्य शासनाची योजना एकत्रित केल्याने केंद्रशासनाचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिकभारही न्यून होईल.

सिंधुदुर्ग : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी उपोषणाची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ?

गोवा : कारवाईनंतर कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्यांची काळ्या बाजारात विक्री !

अनुज्ञप्ती घोटाळ्यास उत्तरदायी असलेला खात्यातील एक वरिष्ठ कारकूनच या नव्याने उघडकीस आलेल्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. या विक्रीतून मिळणारा पैसा संबंधित वरिष्ठ कारकून अबकारी निरीक्षकालाही देत होता.

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.

चंद्रपूर येथे ७ वर्षांच्‍या मुलाच्‍या आधारकार्डवर उपमुख्‍यमंत्र्यांचे छायाचित्र !

संबंधित मुलाच्‍या कुटुंबियांनी हे छायाचित्र पालटून घेण्‍यासाठी आधार केंद्रात संपर्क साधला. त्‍यानंतर प्रशासनाने चूक दुरुस्‍त केली, तसेच अशी चूक करणार्‍या एजन्‍सीची चौकशी करून कारवाई करणार असल्‍याचेही सांगितले जात आहे. 

गोरक्षकांमुळे वैराग (सोलापूर) येथे ४३ गोवंशियांना कत्तलीपासून जीवदान !

सगळा गोवंश अहिंसा गोशाळेत उतरवण्‍यात आला. ही कारवाई यशस्‍वी करण्‍यासाठी वैराग पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, तसेच सुधीर भाऊ बहिरवाडे, हृषिकेश कामथे, अक्षय कांचन, राहुल कदम, अखिल भारत कृषी गोसेवा संघ सोलापूरचे शहर संघटक प्रसाद झेंडगे, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे धाराशिव प्रमुख रोहित बागल, तुळजापूरचे गोरक्षक अर्जुन देशमुख आदींचे सहकार्य लाभले.

पहिने (जिल्‍हा नाशिक) येथील इंग्रजी शाळेच्‍या वसतीगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवले !

जिल्‍ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात एका वसतीगृहातील अल्‍पवयीन मुलींना सायंकाळी आणि रात्री पर्यटकांंसमोर नाचवण्‍यात आले. या प्रकरणी संस्‍थेचे चालक आणि शिक्षिका यांच्‍याविरुद्ध वाडीवर्‍हे पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील पहिने येथे ही घटना घडली आहे.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करणारे वास्तव !

‘चांगली बातमी आहे’, असा एक दिवस तरी हिंदू आणि भारत यांच्यासाठी आहे का ?’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सांगली येथे व्यावसायिकाच्या बंगल्यावर ‘ईडी’ची धाड !

आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या अन्वेषणाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यास ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी नकार दिला आहे.

शिवणी (जिल्‍हा नांदेड) येथे गोरक्षकांवरील आक्रमणाचा संगमनेर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांकडून निषेध !

नांदेड जिल्‍ह्यातील शिवणी येथे धर्मांधांनी केलेल्‍या आक्रमणात एका गोरक्षकाचा मृत्‍यू झाला, तसेच अन्‍य गोरक्षक गंभीर घायाळ झाले. याचा निषेध संगमनेर (जिल्‍हा अहिल्‍यानगर) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांनी करून उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांना बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले.