गोवंशियांची कत्तल करणार्‍या आरोपींना ३ वर्षे हद्दपार करण्‍याची बजरंग दलाची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून असे निर्णय का घेत नाही ?

दिंड्यांसाठी ६५ एकरमधील प्‍लॉटची जागा निश्‍चित करण्‍यासाठी भाविकांचे निवेदन !

दिंड्यांसाठी येथील ६५ एकर मधील प्‍लॉट कायमस्‍वरूपी निश्‍चित करण्‍यात यावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांना दिले.

इंदापूर (पुणे) येथे संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा रंगला !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यातील दुसरे रिंगण इंदापूरमधील कस्‍तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्‍या प्रांगणामध्‍ये पार पडले. नगारखान्या पाठोपाठ २७ दिंड्या, संत तुकाराम महाजांची पालखी, ५० हून अधिक दिंड्या रिंगण प्रांगणामध्‍ये पोचल्‍या.

माहीममध्‍ये अज्ञातांनी औरंगजेबासह प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावले !

माहीम परिसरात अज्ञातांनी उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेब यांचे वादग्रस्‍त मजकुरासह एकत्रित छायाचित्र असलेले फलक मध्‍यरात्री लावले होते. सकाळी स्‍थानिक शिवसैनिकांनी तात्‍काळ हे फलक हटवले.

झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासाठी ‘झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।’ ही काव्‍यपंक्‍ती उचित ठरते. भारतात आजवर १७ पंतप्रधान होऊन गेले; परंतु एका तरी नावाचा जयघोष केला गेल्‍याचे आपण कधी पाहिले वा ऐकले आहे का ? नाही ना ! याउलट ‘मोदी’ हे नाव केवळ भारतातच नव्‍हे, तर सातासमुद्रापारही तितक्‍याच आवेशाने, उत्‍साहाने … Read more

राजस्‍थान येथील १६ व्‍या राष्‍ट्रीय योगासन स्‍पर्धेत ‘केळकर योग वर्ग मिरज’च्‍या योगपटूंचे दैदीप्‍यमान यश !

कोटा, राजस्‍थान येथे १७ आणि १८ जून या दिवशी ‘आर्ट ऑफ लर्निंग इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या वतीने आयोजित १६ व्‍या राष्‍ट्रीय योगासन स्‍पर्धेत ‘केळकर योग वर्ग मिरज’च्‍या योगपटूंनी दैदीप्‍यमान यश मिळवले आहे.

बीड भागात बालविवाह लावण्‍याचा प्रयत्नामुळे नवरदेवासह १६२ जणांवर गुन्‍हा नोंद !

शहरातील पेठ बीड भागात २१ जून या दिवशी होत असलेला बालविवाह प्रशासनाने रोखला होता; मात्र या प्रकरणात बालविवाह लावण्‍याचा प्रयत्न केल्‍यामुळे नवरदेव, त्‍याचे आई, वडील, मुलीचे आई, वडील, नातेवाईक आणि वर्‍हाडी अशा १६२ जणांविरोधात गुन्‍हा नोंद झाला आहे.

बराक ओबामा इस्‍लामी देशांतील हिंदूंच्‍या रक्षणावर का बोलत नाहीत ?

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍याशी भारतातील मुसलमानांच्‍या सुरक्षेच्‍या सूत्रावर चर्चा केली पाहिजे, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी या दोघांच्‍या भेटीपूर्वी दिला होता.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवातील विविध क्षणांचा छायाचित्रमय वृत्तांत

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात १६ ते २२ जून हे ७ दिवस विविध माध्‍यमांतून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा जागर करण्‍यात आला. राष्‍ट्र, धर्म आणि संस्‍कृती यांच्‍या संदर्भात विविध माध्‍यमांतून जागृती करण्‍यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे सद़्‍गुरु आणि कार्यकर्ते यांचा कर्नाटक येथील अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी. यांच्‍याकडून गौरव !

अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी. यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, समितीच्‍या आय्.टी. सेलचे समन्‍वयक श्री. प्रदीप वाडकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्‍ता नागेश जोशी यांचा गौरव केला.