सांगली – सांगली येथे दोन व्यावसायिकांच्या शिवाजीनगर येथील बंगल्यांवर ‘ईडी’ने २३ जूनला धाड टाकली आहे. यातील एक जण हे सांगलीतील मोठे इलेक्ट्रिकल व्यावसायिक आहेत. आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या अन्वेषणाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यास ‘ईडी’च्या अधिकार्यांनी नकार दिला आहे.