भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार !

भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्‍यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत.

मॉरीशसमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करणारा चित्रपटगृह बाँबने उडवून देण्याची धमकी !

हिंदी महासागरातील बेटांचा देश असलेल्या मॉरिशसमध्ये ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित करणार्‍या एका चित्रपटगृहला बाँबने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : १० जणांचा मृत्यू, तर ४०० घरे पेटवली

मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला.

इस्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारताने २९ मे या दिवशी ‘एन्व्हीएस-०१’ हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित केला. येथील कॅप्टन सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून इस्रोने जी.एस्.एल्.व्ही. (जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल) एफ् १२ या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अंतराळ प्रक्षेपित केला.

रुग्णाला मालवण येथून सिंधुदुर्गनगरी येथे नेतांना रुग्णवाहिका बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ

या घटनेमुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हा गंभीर स्थितीतील रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे शासनाने चांगल्या स्थितीतील रुग्णवाहिका रुग्णालयांना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

कोडंकुरू (कर्नाटक) येथे ख्रिस्ती प्रार्थनास्थळाचे बांधकाम थांबवण्याचा भाजप आमदाराचा आदेश !

हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांकडून आखण्यात आलेले षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूसंघटनच आवश्यक !

उत्तर कोरियाने ७० सहस्रांहून अधिक ख्रिस्त्यांना कारागृहात डांबले !

उत्तर कोरियातील ५० टक्के लोक नास्तिक आहेत, २५ टक्के लोक बौद्ध आहेत आणि उर्वरित २५ टक्के ख्रिस्ती आणि इतर धर्मीय आहेत. उत्तर कोरिया साम्यवादी देश असल्याने तो ‘नास्तिकांच देश’ म्हणून ओळखला जातो.

यवतमाळ येथील भागवताचार्य संतोष महाराज जाधव यांच्यावर गोतस्करांचे आक्रमण !

महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा आहे. असे असतांनाही राज्यात गोतस्करी होते आणि त्याला विरोध करणार्‍या गोप्रेमींना जीव मुठीत धरून जगावे लागते. महाराष्ट्रात अशा घटना घडणे संतापजनक होय !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर – सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिज येणार !

‘‘या ‘वेब सीरिज’च्या माध्यमातून वीर सावरकर यांचे विचार, शौर्य, बलीदान युवकांपुढे आणण्याचा प्रयत्न असेल.’’

सावरकर जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यामुळेच काही पक्षांचा उद्घाटनला विरोध ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान क्रांतीकारक होते. ते साहित्यिक आणि समाजसुधारकही होते.