कोडंकुरू (कर्नाटक) येथे ख्रिस्ती प्रार्थनास्थळाचे बांधकाम थांबवण्याचा भाजप आमदाराचा आदेश !

परिसरात एकही ख्रिस्ती रहात नसतांना या प्रार्थनास्थळाच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मांतराचा घाट घातला जात असल्याची हिंदूंमध्ये भावना !

पुत्तूरू (कर्नाटक) – राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरु तालुक्यातील कोडंकुरू गावात १.७३ एकर जागेमध्ये एका इमारतीचे बांधकाम चालू असून तेथे ख्रिस्त्यांचे प्रार्थनास्थळ उभारण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली असून त्या क्षेत्रात एकही ख्रिस्ती रहात नसतांना तेथे या इमारतीच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मांतराचा घाट घातला जात आहे, अशी त्यांच्यात भावना आहे.

प्रतिकात्मक चित्र

त्यामुळे उडुपी येथील भाजपचे आमदार यशपाल सुवर्ण यांनी हे काम त्वरित थांबवण्याचा आदेश स्थानिक प्रशासनाला दिला आहे. धर्मांतरासाठीच हे बांधकाम होत असल्याच्या पुराव्यांचे परीक्षण करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. ‘या बांधकामाला अवैधपणे अनुमती देण्यात आल्याचे सांगत ती रहित करण्यात यावी’, अशी ठाम मागणी स्थानिक हिंदु नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांकडून आखण्यात आलेले षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूसंघटनच आवश्यक !