मॉरीशसमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करणारा चित्रपटगृह बाँबने उडवून देण्याची धमकी !

इस्लामिक स्टेटच्या समर्थकांचे कृत्य !  

मॉरिशस – हिंदी महासागरातील बेटांचा देश असलेल्या मॉरिशसमध्ये ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित करणार्‍या एका चित्रपटगृहला बाँबने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. इस्लामिक स्टेटच्या समर्थकांकडून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला चिठ्ठी पाठवून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.