नवी देहली – भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत. वायूदल आणि नौदल यांतील अधिकार्यांचीही भूदलात नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. मेजर आणि लेफ्टनंट कर्नल या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकार्यांचीही अदलाबदली होणार आहे. अशा नियुक्तीमुळे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखला जाईल, असे एका अधिकार्याने सांगितले.