मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : १० जणांचा मृत्यू, तर ४०० घरे पेटवली

४ आमदारांच्या घरांवर आक्रमण

इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला. यात आसाम पोलिसांच्या २ कमांडोंचाही समावेश आहे. राज्यात ४०० घरे पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. संतप्त जमावाने ४ आमदारांच्या घरांवरही आक्रमण केले. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्‍चिम, बिष्णुपूर आणि कक्चिंग जिल्ह्यांत नक्षलवादी अन् सुरक्षादल यांच्यात गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. सैन्यदलप्रमुख मनोज पांडे हे गेल्या २ दिवसांपासून मणीपूरमध्ये आहेत. आतापर्यंत सुरक्षादलांसमवेत झालेल्या चकमकीत अनुमाने ४० नक्षलवादी ठार झाले आहेत.